दिवसेंदिवस ग्रंथांच्या मांदियाळीत होणारी वाढ हीच माझ्यासाठी लाखमोलाची श्रीमंती...!
ग्रंथाच भलंमोठं कपाट....एका खोलीतील एकांतात हाती एखादा ऐतिहासिक ग्रंथ...अन राजे समोर आहेत...नव्हे मीच त्यांच्या दरबारी कारकुनी करतोय वा द्वारपाल म्हणून उभा आहे अन शिवप्रभू दरबाराशी हितगुज साधत झालेला संवाद ऐकतोय अशी स्वप्नवत अनुभूती...लीनता तल्लीनता....प्रपंचात असूनही ही मनविभोर समाधी स्थिती मिळवून देणारी ही संपत्ती...म्हणजे सर्व ग्रंथ... माझ्या काळजाचा भाग.....ग्रंथ अन मी...अद्वैत..
ग्रंथाविषयी मी पामर आणखी काय सांगणार....?🙏
सर्वांना असेच ग्रंथ सान्निध्य लाभून अनुभवविश्व समृद्ध होवो...तसेच शब्दांना ग्रंथ रुप देऊन जगताचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या सर्व लेखक महोदयांना सुद्धा....आजच्या वैश्विक ग्रंथदिनी शुभेच्छा..!

ता.क.-वडिलांकडून आलेला ग्रंथ साठा त्यात होत असलेली भरघोस वाढ...अन हे पाहून बाबांच्या चेहऱ्यावरील अभिमानाचे भाव....आणखी काय हवं...!हेच सर्वोच्च सुख..!
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! 🚩 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय!🚩
भारतमाता की जय..!🇮🇳जयहिंद!🇮🇳वंदे मातरम!