नाद_खुळा_फक्त_जिल्हा_परिषद_शाळा...!! हादगाहस्त नक्षत्र संपले आणि सोमवारी(दि.०९रोजी) आमच्या शाळेचा हादगा बोळवला...... म्हणजे विसर्जित केला.त्यावेळी मिष्टान्न अर्थात स्नेहभोजनाचा(माध्यान्ह भोजनातील एक उपक्रम) कार्यक्रम उरकण्यात आला.शिरा-पुरी-मिसळभाजी-पापड-लोणचे-भात-आमटी असा यथेच्छ भोजनाचा बेत होता.
दुपारी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला नि सायं. 4 च्या सुमारास ओढ्यामधील वाहत्या पाण्यात हादगा विसर्जित केला.
पंधरा एक दिवसातील हादगा उपक्रमातील असंख्य शैक्षणिक मूल्य.....नक्की वाचा आणि प्रतिक्रिया द्या..सुधारणा सांगा....नक्की बदल करु..!
माझा खेळ मांडिला करिन तुझी सेवा..!
गत महिन्यात हस्त नक्षत्रावर स्थापित झालेला हादगा तथा भोंडला...!
विद्या मंदिर,मरळे (शाहूवाडी) येथील चिमुकल्या मुलींनी सुद्धा अतिशय मनापासून हा हादगा बसविला. दररोजहार-फुले यांचे नियोजन गटानुसार करण्यात आले होते.साडेचार वाजले की हादग्याची पूर्वतयारी आणि सुमारे अर्धा तास या कलाकार मुली अगदी फेर धरून नाच करायच्या आणि हादगा साजरा करायच्या.सोबत ग्रामीण ढंगातील गाण्यांच्या सुरावटीने काही औरच वातावरण तयार व्हायचे.या सुरावटीने ग्रामस्थांचे पाय हि काही काळ शाळेजवळ थबकायचे; मुलींची हि कलाकारी पाहून खुश होऊन जायचे.
सर्वात शेवटी खिरापत आणि ती ओळखण्याची चढाओढ...ए है.....दिवसभराच्या आनंदाला अगदी उधाण यायचं.कधी अंदाजे,कधी वासावरून,कधी आवाजावरून कधी तर्क.....नाही...नाही...!नाही....अं....नाही....!!अहं...नाहीच ओळखली...!....आमचा गट नाद खुळा आहे...नाहीच ओळखणार आमची खिरापत.....!अशा हास्य-गोंधळ-शाब्दिक कोट्या करत शेवटी खिरापतीचा पदार्थ सांगितला जायचा...!
रांगेत बसून वाटप त्याचा आस्वाद घेत उद्याच्या गटाचे नाव पुकारले जायचे....अन यासरशी शाळेची घंटा सुद्धा वेळ झाल्याचे विसरुन जायची मग उद्याच्या तयारीच्या बोलाचालीतच चिमुकल्यांची आनंदलेली पावले हळू हळू घराकडे वळायची...!
काय नाही शिकलो...?..यातून क्षणभर अभ्यासक्रमाचे गाभा घटक पाहिले तर अगदी सर्वच घटक अशा छोट्या वाटणाऱ्या पण बहुत शिकवून जाणाऱ्या हादग्यातून शिकल्याची प्रचितीच व्हायची.बघू या काही घटक...!
✔संघटन-गटकार्य.
✔खिलाडू वृत्ती.
✔व्यवस्थापन(नियोजन/पूर्वतयारी)
✔स्त्री पुरुष समानता(खिरापतीची तयारी)
✔लोकगीतांचा जागर.
✔संस्कृती-ग्रामीण रिवाजाची ओळख
✔पारंपरिक कलागुणांना वाव
✔शारीरिक शिक्षण-सर्वांग सुंदर हालचाली
✔कला-गीतगायन,नृत्य
✔कार्यानुभव-हार बनविणे,रांगोळी रचना आदी
✔गीतांमधून बेटी बचाओ चा जागर
✔ऐतिहासिक घटनांचा गीतांमधून उल्लेख
(शिवाजी अमुचा राजा त्याचा तो चाकण किल्ला)
✔आपसूकच हसत खेळत शिक्षण
✔बौद्धिक विकास-गीत पाठांतर
✔विज्ञान विषयाशी संबंधित-विविध खाद्य पदार्थ,पाककला,जीवनसत्त्वे घटक यांची ओळख.
✔मुलींसाठी आनंद लुटण्यासाठी मुक्तद्वार म्हणजे भोंडला.
✔पर्यावरण-विविध फुले पाने आणि ऋतू-नक्षत्र बदल याची माहिती.
✔भागातील फुला-फळांची माहिती.
आदी आदी आदी......
आणखी किती शैक्षणिक बाबींशी सहसंबंध जोडता येईल.
खाजगी बेगडी इंग्रजाळलेल्या शाळेतील कृत्रिम इव्हेंट साठी पैसे खर्चून फोटो सेशन करण्यापेक्षा हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व मूल्यांचा जागर करणारा हादगा आपलासा वाटतो ना..?
शेवटी काय निखळ आनंद आणि त्यातून माणूस बनवण्याचं शिक्षण हेच खरं शिक्षण....!
बरोबर ना...!काय वाटत याबाबत आपल्याला...व्यक्त व्हाल..?
म्हणूनच...
#नाद_खुळा_फक्त_जिल्हा_परिषद_शाळा..!
विद्या मंदिर,मरळे (शाहूवाडी) येथील चिमुकल्या मुलींनी सुद्धा अतिशय मनापासून हा हादगा बसविला. दररोजहार-फुले यांचे नियोजन गटानुसार करण्यात आले होते.साडेचार वाजले की हादग्याची पूर्वतयारी आणि सुमारे अर्धा तास या कलाकार मुली अगदी फेर धरून नाच करायच्या आणि हादगा साजरा करायच्या.सोबत ग्रामीण ढंगातील गाण्यांच्या सुरावटीने काही औरच वातावरण तयार व्हायचे.या सुरावटीने ग्रामस्थांचे पाय हि काही काळ शाळेजवळ थबकायचे; मुलींची हि कलाकारी पाहून खुश होऊन जायचे.
सर्वात शेवटी खिरापत आणि ती ओळखण्याची चढाओढ...ए है.....दिवसभराच्या आनंदाला अगदी उधाण यायचं.कधी अंदाजे,कधी वासावरून,कधी आवाजावरून कधी तर्क.....नाही...नाही...!नाही....अं....नाही....!!अहं...नाहीच ओळखली...!....आमचा गट नाद खुळा आहे...नाहीच ओळखणार आमची खिरापत.....!अशा हास्य-गोंधळ-शाब्दिक कोट्या करत शेवटी खिरापतीचा पदार्थ सांगितला जायचा...!
रांगेत बसून वाटप त्याचा आस्वाद घेत उद्याच्या गटाचे नाव पुकारले जायचे....अन यासरशी शाळेची घंटा सुद्धा वेळ झाल्याचे विसरुन जायची मग उद्याच्या तयारीच्या बोलाचालीतच चिमुकल्यांची आनंदलेली पावले हळू हळू घराकडे वळायची...!
काय नाही शिकलो...?..यातून क्षणभर अभ्यासक्रमाचे गाभा घटक पाहिले तर अगदी सर्वच घटक अशा छोट्या वाटणाऱ्या पण बहुत शिकवून जाणाऱ्या हादग्यातून शिकल्याची प्रचितीच व्हायची.बघू या काही घटक...!
(शिवाजी अमुचा राजा त्याचा तो चाकण किल्ला)
आदी आदी आदी......
आणखी किती शैक्षणिक बाबींशी सहसंबंध जोडता येईल.
खाजगी बेगडी इंग्रजाळलेल्या शाळेतील कृत्रिम इव्हेंट साठी पैसे खर्चून फोटो सेशन करण्यापेक्षा हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व मूल्यांचा जागर करणारा हादगा आपलासा वाटतो ना..?
शेवटी काय निखळ आनंद आणि त्यातून माणूस बनवण्याचं शिक्षण हेच खरं शिक्षण....!
बरोबर ना...!काय वाटत याबाबत आपल्याला...व्यक्त व्हाल..?
म्हणूनच...
#नाद_खुळा_फक्त_जिल्हा_परिषद_शाळा..!
■विशेष सहाय्य-श्री भरतसिंह वळवी(मुख्याध्यापक)
■सोबत प्रतिमा-हादग्याचे काही प्रसंग-आनंदक्षण, गोलाविष्कार,खिरापत-स्नेहभोजन वाटप,इत्यादी

जयहिंद
🇮🇳
वंदे मातरम
🇮🇳
भारतमाता की जय..!
🇮🇳
वंदे मातरम
भारतमाता की जय..!
अध्यापक,विद्या मंदिर,मरळे.(ता.-शाहूवाडी)

No comments:
Post a Comment