Sunday, 15 January 2017

चिमुकल्या विराजचा प्रश्नांचा भडिमार...







पत्रकार दिनाचा कार्यक्रम आटोपून घरी आल्यानंतर चिमुकल्या विराजचा प्रश्नांचा भडिमार...
आज शाळेला का नाही गेला..?
आज काय होतं?
मग तुमच्या डोक्यावर फेटा का बांधला...?
साऱ्या प्रश्नांची उत्तरं न देता;त्याच्या डोक्यावर फेटा घातला अन काय..??
तो फेटा मिरवतच,सारे प्रश्न बाजूला ठेऊन (नव्हे विसरुन!)त्याने फोटो सेशनसाठी असा हट्ट धरला....!
पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाचा भरगच्च विधायक पुरस्कारांसह त्यांचे मानपत्र लेखन आणि सूत्र संचालन असे आजचे दोन्ही अनुभव खूपच मौलिक....आनंददायी...!
Arun Talekar
Dhanaji Gurav Dhanaji Gurav
धनाजी पाटील Ravi Patil
या पत्रकार बंधूंसह पश्चिम पन्हाळा पत्रकार संघाचे ऋण...
ऋणानुबंध राहावेत अखण्ड...!
पुनःश्च पत्रकार दिनाच्या मनस्वी शुभेच्छा..!
जयहिंद
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले
दि.०६/०१/२०१७

✒पत्रकार दिन..









✒पत्रकार दिन..
पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने विविध सहा उपविभागातून जे लोक सामाजिक-शैक्षणिक-राष्ट्रीय क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत असतात;पण अशीच मंडळी तितकीच दुर्लक्षलेली आणि प्रसिद्धीपासून दूर असतात...
ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना वर्षभरात दृष्टीस पडलेल्या अशा अवलियांना हेरुन विना शिफारस;त्रयस्थ अवलोकन करुन पत्रकार दिनाला अशा अवलियांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.विना शिफारस फक्त त्यांचं निस्वार्थ कार्य पाहून तसेच त्या पुरस्कारामुळे इतरांना प्रेरणा मिळून त्यांनीही समाज वा राष्ट्रकार्यात झोकून द्यावं या अपेक्षेसह सदर पुरस्कार देण्यात येतात;हे पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाचे विशेष म्हणावे लागेल.
यंदाचा १५ पुरस्कारांचा वितरण सोहळा पत्रकार दिनी बाजारभोगाव(पन्हाळा) येथे पार पडला.या पुरस्कारकर्त्यांना मानाचा फेटा श्रीफळ पुष्प गुच्छ आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी दिलेल्या मानपत्राचे लेखन करण्याची धुरा माझ्याकडे सोपवली होती.मला हे मानपत्र लिहिताना असंख्य विधायक बाबी गवसल्या..त्याच बाबी मानपत्रातून अवतरल्या.उद्यापासून सलग पंधरा दिवस ती मानपत्रे fb वरील माझ्या सर्व स्नेह्यांसाठी देत आहे.अशा चांगुलपणामुळेच समाज टिकून आहे राष्ट्र अखण्ड आहे याची खात्री वाटते.
ता.क.:-सदर वाचनातून अन्य कोणाला प्रेरणा मिळाली तरी सार्थक होईल.या मानपत्रांच्या पोस्टला टॅग करण्याची इच्छा असणाऱ्या स्नेह्यांनी कंमेंट्स मधून कळवावे.दररोज सायंकाळी सात वाजता #मानपत्र_पत्रकारदिन पोस्ट केल्या जातील.
सर्व श्रेय पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ आणि संयोजक यांचे....!
#मी निमित्तमात्र...!
पत्रकार दिन:काही क्षणचित्रं/कार्यक्रमपत्रिका.
दि.०६/०१/२०१७
जयहिंद
वंदे मातरम..!🇮🇳
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले


Friday, 30 December 2016




कविश्रेष्ठ कै.मंगेश पाडगावकर....
आशावादी_कविता_सम्राट-
~~सहजता,सरलता आणि तरलता यांची आपल्या कवितांमधून खुबीने पेरणी करणारे...
~~कवितेला नवसंजीवनी देऊन कविता या वाङ्मयप्रकाराचा जगभर प्रसार करणारे....
~~चिमुकल्यांसाठी सांग सांग भोलानाथ लिहून बालपणात जायला लावणारे....
~~प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं नि आमचं सेम असतं...असे सांगून प्रेम भावनेची समानानुभूती देणारे...
~~अर्ध्या पेल्याच्या...सरला आहे की भरला आहे?-या दाखल्यातून जीवनातील विविध प्रसंगाकडे सकारात्मक बघण्याची दृष्टी देणारे.....
~~चिऊताई दार उघड चिऊताई या सारख्या कवितेमधून निराशेच्या गर्तेतून वाचकाला बाहेर पडायला लावणारे...
~~इतकं दिलंत इतकं दिलंत तुम्ही मला माणूस केलंत तुम्ही मला अशा काव्यातून समजाप्रत निसर्गाप्रत कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारे....
~~आपलं गाणं आपण गावं लिहून इतर आपल्याला काय बोलतात;पेक्षा आपण त्याकडे दुर्लक्ष करून गायला भाग पाडणारे...
~~जगणं सुंदर आहे असं लिहून या जन्मावर शतदा प्रेम करावे असे आवर्जून सांगणारे.....
~~झोपाळ्यावाचून झुलायला शिकवणारे.....
#प्रतिभावंत_दिवंगत_कवी_मंगेश_पाडगावकर यांच्या प्रथम पुण्यस्मृतीदिनी विनम्र अभिवादन...!
माझे आवडते कवी त्यांच्या कविता आजही मी ऐकतो...गातो...सांगतो....म्हणतो....मनातल्या मनात कधी बोलण्यात...कधी प्रत्यक्ष गायनात...!
इयत्ता आठवीत मी त्यांच्या #बोलगाणी कविता संग्रहातील सर्व कविता हस्तलिखिताद्वारे वहीमधून संग्रहित ठेवल्या होत्या.(पोस्टमधील सदर हस्तलिखिताची #मृत्यूनंतर एका कवितेची प्रतिमा)आज आणि उद्या....कधीही ती वही मला नवप्रेरणा देऊन जाते..!हेच त्यांच्या कवितेचं अमरत्व स्वरुप म्हणावं लागेल.
मराठी वाङ्मयामधील दीपस्तंभ म्हणून त्यांच्या स्मृतीस वंदन..!
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले

Friday, 2 December 2016

#भविष्यातील_हेलिकॉप्टर_पायलट
साडेचारच्या सुमारास आकाशातून घरघर ऐकायला आली.शब्दांच्या भेंड्या खेळण्यात गुंग असलेल्या मुलांना बाहेर हेलिकॉप्टर आल्याचे सांगितले.सारीच चिमुकली हातातल्या वही-पाटी-लेखणीसह पटापट बाहेर पडली.
आणि आकाशातल्या हेलिकॉप्टरच्या आवाजाकडे कान देऊन कुठं नजरेच्या टप्प्यात येते का ते निरखू लागली.ज्यांना ते 🚁 दिसले त्यांच्या चेहऱ्यावरचा अत्यानंद 😁मला टिपायचा होता....तो माझ्याकडून अलगद टिपला गेला....!
हाच #आनंदक्षण मिळवण्यासाठी आपल्याला लहानपण हवे,हो ना....??
लहानपण देगा देवा....
🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁
नाद खुळा फक्त जिल्हा परिषद शाळा
🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁
✔विद्या मंदिर,मरळे(शाहूवाडी)येथील आकाशातील हेलिकॉप्टर निरखताना घेतलेला आनंदक्षण..!
🚁Moto G2
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले.
अध्यापक
विद्या मंदिर,मरळे (शाहूवाडी)
दि.१०/११/२०१६
#शुभ_सांज...!
निसर्गाची विविध रूपं हि आपल्या समोर हात जोडून उभी असतात.त्याचा तशाच रसिक दृष्टीने मागोवा घेतल्यास मौल्यवान शिकवणसुद्धा देतात.
निसर्ग हे बदलाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल.इतका बदल अपेक्षित ठेवूनच निसर्गाचे चक्र अव्याहतपणे सुरु असते.
बदल स्वीकारले तरी निसर्गाचा मूळ बाज बदलत नाही.सूर्यास्ताच्या वेळची रंगांची उधळण हि काही बदलत नाही..!
तशाच प्रकारे माणसांनी सुद्धा बदल स्वीकारत मार्गाक्रमण केल्यास जीवनाचा आनंद लुटता येईल...पण हो माणुसकीचा अमूल्य धागा निरंतर ठेवूनच हा बदल आनंदाने स्विकारुया..!
नोटा बदलल्या आपणही तो सकारात्मक पद्धतीने स्वीकारु... त्याला सामोरे जाऊ या....परस्परातील राष्ट्रीयत्वाचा धागा अखंड ठेवूनच....!
सूर्याचा अस्त जरी होत असला तरी रंगांची आकर्षक उधळण आपल्याला जीवनाच्या आनंदी रंगाची जाणीव करुन देतोय...!
मग बदलूया ना....नोटा आणि दृष्टी...आनंदाने राष्ट्रीयत्वाची ज्योत जागी ठेवत...!
सर्व स्नेही जणांना शुभ सांज...शुभ संध्या...!
जयहिंद
वंदे मातरम..!
(माळापुडे येथील शाळा परिसरातून घेतलेले सायंकाळचे सूर्यास्त क्लीक...motoG2)
✒श्री विशाल आनंदराव हारगुले.
दि.१८/११/२०१६
शिखरावरी रवी हा आला
'श्रीगणेश'वंदना करण्याला
भगवा-ध्वज आकाशी भिडला
जगज्जेते पद भूषवायाला...!!
✒विशाल
श्री गणेश मंदिर,जयसिंगपूर.
क्लीक-motoG2
दि.२०/११/२०१६
नाद खुळा फक्त जिल्हा परिषद शाळा..!
तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण:पंचायत समिती,शाहूवाडी.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील डिजिटल भारत घडवण्याच्या दिशेने....इ-गव्हर्नन्स इ-लर्निंग आणि डिजिटल स्मार्ट जिल्हा परिषद शाळा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.त्याचाच एक भाग म्हणून 35 शिक्षकांच्या टीमचे प्रशिक्षण अगदी online स्वरुपात विद्या मंदिर,कोळगाव शाळेत संपन्न झाले.
यावेळी मा.श्री आर डी पाटील (गटशिक्षणाधिकारी, शाहूवाडी) सरांनी प्रेरणादायी मनोगत मांडून वर्गाला उद्बोधित केले.तंत्रस्नेही शिक्षकांचे जिल्हा टीम लीडर श्री लक्ष्मण वाठोरे सरांनी खूपच महत्त्वपूर्ण इ-टिप्स दिल्या.अगदी दिवसभरात विविध तांत्रिक बाबीवर चर्चा होऊन प्रत्येकाचे वैयक्तिक ब्लॉग उघडले गेले.
३५ब्लॉगचे यशस्वी पदार्पण एक पाऊल...डिजिटल दुनियेत..!
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले.
'अध्यापक'
विद्या मंदिर,मरळे(शाहूवाडी)
दि.२५नोव्हेंबर,२०१६