Friday, 2 December 2016

नाद खुळा फक्त जिल्हा परिषद शाळा..!
तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण:पंचायत समिती,शाहूवाडी.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील डिजिटल भारत घडवण्याच्या दिशेने....इ-गव्हर्नन्स इ-लर्निंग आणि डिजिटल स्मार्ट जिल्हा परिषद शाळा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.त्याचाच एक भाग म्हणून 35 शिक्षकांच्या टीमचे प्रशिक्षण अगदी online स्वरुपात विद्या मंदिर,कोळगाव शाळेत संपन्न झाले.
यावेळी मा.श्री आर डी पाटील (गटशिक्षणाधिकारी, शाहूवाडी) सरांनी प्रेरणादायी मनोगत मांडून वर्गाला उद्बोधित केले.तंत्रस्नेही शिक्षकांचे जिल्हा टीम लीडर श्री लक्ष्मण वाठोरे सरांनी खूपच महत्त्वपूर्ण इ-टिप्स दिल्या.अगदी दिवसभरात विविध तांत्रिक बाबीवर चर्चा होऊन प्रत्येकाचे वैयक्तिक ब्लॉग उघडले गेले.
३५ब्लॉगचे यशस्वी पदार्पण एक पाऊल...डिजिटल दुनियेत..!
✒ श्री विशाल आनंदराव हारगुले.
'अध्यापक'
विद्या मंदिर,मरळे(शाहूवाडी)
दि.२५नोव्हेंबर,२०१६

No comments:

Post a Comment